अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत भाजपने १५० + चे मिशन ठेवले होते. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याने भाजपला १०० चा आकडाही  गाठता आला नाही. त्यामुळे धापा टाकत भाजपला ९९ पर्यंत मजल मारता आली. गेल्या दोन दशकात भाजपची ही सर्वात खराब कामगिरी ठरली. मात्र, निवडणुकीनंतर भाजपने आपला १०० चा आकडा गाठलाय. त्यामुळे भाजपचे शतक पूर्ण झालेय.


हे लागले गळाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने फोडाफोडी करण्यात यश मिळवत ९९ आकला पाठी टाकत १००चा आकडा पुरा केलाय. लुणावाडी येथून अपक्ष आमदार रतन सिंग राठोड यांना आपल्या गळाला लावत त्याचे समर्थन  मिळवलेय आणि विधानसभेत १००चा आकडा पूर्ण केलाय. 


काँग्रेसने नाकारले आणि अपक्ष म्हणून विजयी


रतन सिंग राठोड हे आधीचे काँग्रेस नेता आहेत. त्यांना काही कारणानिमित्ताने काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. असे असताना त्यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि उमेदवारीही मागितली होती. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झालेत.


भाजपला पाठिंब्याचे पत्र


रतनसिंग राठोड यांनी बाजपला पाठिंबा देणार पत्र राज्यपाल यांना सादर केले. दरम्यान, भाजपकडून विजय रुपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असून भाजपने त्यांनाच संधी दिलेय.


भाजप सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये सरकार स्थापन करत आहे. असे असताना काँग्रेसने गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर दिली. भाजपने ७७ जागांवर विजय मिळवला. तसेच काँग्रेसने समर्थन दिलेले तीनही उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसकडे ८० चा आकडा आहे.