नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गुजरातमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजनी मध्ये क्षणाक्षणाला बदल होताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच भाजपला मागे टाकून कॉंग्रेसने आघाडी घेतली. मात्र, पुन्हा एकदा काँग्रेसवर कडी करत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस बॅकफुटला तर, भाजप फ्रंडला अशी स्थिती पहायला मिळत आहे.


ताज्या वृत्तानुसार भाजप सध्या 108 जागांवर आघाडीवर आहे. तर, कॉंग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 4 जागांवर अगाडीवर आहेत. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रचंड पिछाडीवर आहेत. जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हेही जोरदार आघाडीवर आहेत. त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.


कडेकोट पोलीस बंदोबस्तात 33 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही मतमोजणी एकूण 37 केंद्रांवर सुरू आहे. गुजरातमध्ये झालेल्या 182 जागांसाठी 68.41 टक्के मतदान झाले होते. उत्तर गुजरातमध्ये 32 जागा आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35, सौराष्ट्र 54 आणि मध्य गुजरातमध्ये 91 जागा आहेत.