नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


गुजरात-हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात मतदानाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे तर हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होण्याची चिन्ह आहेत. गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून असलेली सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. तसंच गुजरातमध्ये गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच मोदींशिवाय दुस-या नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जात आहेत. 


गुजरातमध्ये काँग्रेससमोर भाजपचं मोठं आव्हान


तर दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातमध्ये एकही जागा जिंकला आलेली नव्हती. तसंच राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी तब्बल 16 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळं काँग्रेससमोरील आव्हानं वाढलेली आहेत. राहुल गांधींनी गेल्या पंधरा दिवसात दोनदा गुजरातचा दौरा केला.