अहमदाबाद : गुजरातमधून रिक्त असलेल्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजलेपासून मतदानाला सुरूवात झाली. तिनपैकी दोन जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत. तिसऱ्या जागेसाठी मात्र रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांचे भवितव्य पणाला लागले आहे. अहमद पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आहेत. त्यामुळे भाजपने ही निवडणुक अत्यंत प्रतीष्ठेची केली असून, पटेलांच्या पराभवाच्या रूपात कॉंग्रेसचे नाक कापण्यासाठी रणनिती आखली आहे. अमित शहा स्वत: या रणनितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एकूण मतसंख्या पाहता शहा आणि इराणी यांचा विजय निश्चित आहे. मात्र, कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांना 45 मतांची गरज आहे. त्यातच कॉंग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ही गरज आणखी वढली असून, कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ 57 वरून 51 वर आले आहे. त्यामुळे आहेत ते आमदार तरी कायम रहावेत यासाठी कॉंग्रेसने फुटाफुटीच्या भीतीने सावध पावले टाकली. ४४ आमदारांना बेंगळुरुमधील रिसोर्टमध्ये ‘बंदिस्त’ ठेवले. सोमवारी सकाळी हे सर्व आमदार गुजरातमध्ये परतले.


दरम्यान, कॉंग्रेस आमदारांमुळे पटेलांची गाडी 44वरच अडकत आहे. त्यामुळे विजयाचे ठिकाण गाठण्यासाठी त्यांना आणखी एका मताची गरज आहे. आता ही गरज कोण पूर्ण करणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, कॉंग्रेसचा सरकारी आणि युपीएतील घटकपक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 2 आहे. तेव्हा राष्ट्रवादीने मदत केल्यास पटेलांचा पराभवाच्या छायेत असलेला विजयरथ बाहेर येऊ शकतो. मात्र, राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हादरली असून,  आता गुजरात परिवर्तन पार्टी आणि संयुक्त जनता दलाचे आमदारच कॉंग्रेसला वाचवू शकतात.


थोडक्यात


गुजरातमध्ये भाजपचे 121 आमदार आहेत. भाजपला तिसरा उमेदवार निवडूण आणायचा असल्यास आणकी 14 मतांची गरज आहे. दोन्ही पक्षांनी विजयावर दावा सांगितला आहे.  त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पटेल विजयी झाले तर तो थेट अमित शहा यांना धक्का असेल.