गुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
योगेश खरे, झी मीडिया, अहमदाबाद : गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
अंगावर भरपूर दागिने घातलेले हे महोदय महाराष्ट्रातले नाहीत, तर गुजरातमधले आहेत. गुजरातच्या दरियापूर मतदारसंघातले शिवसेना उमेदवार किंजल पटेल. शिक्षण सातवी पास... एकूण संपत्ती पन्नास लाखांच्या घरात. पटेल यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. शपथपत्रात त्यांनी ४५ तोळो सोन्याची अधिकृत माहिती दिलीय. पण त्यांच्या घरात १०० तोळे सोन्याचे दागिने आहेत. मात्र स्वतःचे ४५तोळ्यांचे दागिने अंगावर घालतात.
या परिसरात विविध संस्थांसाठी कर्जवसुलीची कामं किंजल पटेल करतात. त्यासाठी साम दाम दंड भेद यात ते कुशल असल्याचं समजलं जातं.
भाजपाला अंगावर घेत गुजरातमध्ये शिवसेनेनं २५ हून अधिक उमेदवार दिलेत. गुजरातमध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा प्रयोग किती यशस्वी होतो हे निकालानंतरच समजेल.