गुजरात निवडणुकीआधी राहुल काँग्रेस अध्यक्षपदी?
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
निर्णयावर अंतिम मोहर लागण्याची शक्यता
या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याच्या निर्णयावर अंतिम मोहर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रस्तावित तारीख सोनिया गांधी यांना कळवली आहे.
राहुल यांच्या नावावर अंतिम मोहरची शक्यता
काँग्रेस कार्यकारिणीकडून राहुल गांधींच्या नावावर अंतिम मोहर लागल्यानंतरच अधिकृत घोषणेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. काँग्रेस कार्यकारिणीला तारखेत बदल करण्याचेही अधिकार आहेत.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबरला राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.