नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार (Gandrape) केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गावाच्या बाहेर गेली होती. त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली. मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुजरातच्या सूरत (Surat) जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरतमधल्या कोसांबा इथल्या मंगेरोल तालुक्यात ही घटना घडली, गावाच्या बाहेर असलेल्या सुनसान जागेत नेऊन तीन आरोपींनी 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. पीडित मुलगी कोचिंगमधून सुटल्यानंतर आपल्या मित्राला भेटायला गेली. त्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या मित्राबरोबर आईस्क्रिम खात होती. त्यानंतर मित्राबरोबर ती मोटा बोरसारा गावाजवळच्या महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळच्या सुनसान रस्त्यावर गप्पा मारत उभी होती.


पीडित मुलगी आणि मित्र गप्पा मारत असताना तीन जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी मुलीला पकडलं. पण मुलीला वाचवण्याऐवजी तिचा मित्र मुलीला तिथेच सोडून घाबरुन पळून गेला. त्यानंतर आरोपींनी मुलीला सुनसान जागेत नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी मुलीचा मोबाईल फोन घेऊन फरार झाले. पीडित मुलीच्या मित्राने याबाबची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केलं. 


घटनास्थळावरुन पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे तसंच तात्काळ दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिसऱ्या आरोपीचाही शोध सुरु केला. डॉग स्क्वॉडच्या मदतीने तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात पॉक्सोसहित विविध कलमांतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


पुणे गँगरेपप्रकरणी आरोपी अजूनही फरारच
दमऱ्यान महाराष्ट्रीत पुण्यात काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. त्याचबरोबर आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. तीन आरोपींपैकी पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रदेखील जारी केली असून सीसीटीव्हीसुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहेत.