पंचकुला : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरियाणा या दोन राज्यांमध्ये हिंसाचार सुरु झालाय. राम रहीम यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या आणि जाळल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सुरक्षापथकांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. काही ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळण्याच प्रयत्न झाला. पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले.


हरियाणातील अध्यात्मिक गुरू डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला महिलेवरील बलात्कारप्रकरणी सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. या प्रकरणी २८ ऑगस्टला कोर्ट शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहीमच्या समर्थकांनी कोर्टाच्या बाहेर राडा केला. त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडण्यात आले.


काही नाठाळ समर्थकांनी मीडियाच्या ओबी व्हॅनवरही हल्ला केला. सतर्कता म्हणून हरियाणामधल्या अनेक शहरांमधील केबल कनेक्शन तोडण्यात आलं. सुनावणीपूर्वीच पंचकुला सीबीआय कोर्टाच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांसह निमलष्करी दलाच्या कुमक मागवण्यात आलेल्या आहेत. 


अध्यात्मिक गुरू डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब, हरियाणामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मात्र, बाबाचे समर्थक चिडलेत. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे.