Cyber Crime : दारु पिण्याआधीच एका तरुणीची नशा उतरली आहे. एका तरुणीने ऑनलाईन दारु मागवली आणि तिकडेच फसली. ऑनलाईन दारु मागवण्याच्या नादात या तरुणीची हजारो रुपयांची फसवणुक झाले आहे. या तरुणीच्या अकाऊंटमधून हजारो रुपये उडाले आहेत. गुरुग्राममधील एका तरुणीसह हा प्रकार घडला आहे. 


दारुच्या नादात गमावली सेव्हिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुरुग्राममधील एका 32 वर्षीय महिलेने ऑनलाइन दारु मागवली होती. गुगल वर सर्च करुन या महिलेने व्हिस्की ऑर्डर केली. मात्र, व्हिस्कि करताना या महिलेचे 33,000 रुपयांचे नुकसान झाले. महिलेने Google वर 'buy whisky online' असा शोध घेतला, परंतु कोणतीही विश्वसनीय वेबसाइट सापडली नाही. ऑनलाईन सर्च करत असाताना या महिलेला एक फोन नंबर सापडला. महिलेने या क्रमांकाशी साधला. यावेळी संबधीत व्यक्तीने घरी दारु डिलीव्र करु असा  दावा केला. यानंतर महिलेने व्हिस्किची ऑर्डर दिली.


अशी झाली फसवणुक  


व्हिस्कि ऑर्डर करण्यासाठी संबधित महिलेने फोन नंबरवर संपर्क साधला आणि व्हिस्कीची बाटली मागवली. व्हिस्किसाठी तीन हजार रुपये मागितले. व्हिस्किच्या घरपोच डिलीव्हरीसाठी अतिरिक्त  पैसे देण्यास सांगितले होते. यामुळे महिलेने ऑर्डर रद्द करण्याची मागणी केली. ऑर्डर रद्द करण्यासाठी संबधीत व्यक्तीने ऑर्डर करणाऱ्या महिलेला ऑनलाईन 5 रुपये पाठवण्यास सांगितले. पाच रुपये पाठवत असताना  महिलेला बँक खात्यातून  29,986 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. महिलेने तात्काळ बँकेशी संपर्क साधला आणि खाते ब्लॉक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या फोन स्क्रीनवर प्रवेश देणारे कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड केले नव्हते. तरीही, 5 रुपयांच्या व्यवहारानंतर महिलेच्या खात्याचे तपशील लीक झाले आणि तिच्या बँक खात्यातून  29,986 रुपये उडाले. 


ऑनलाईन फ्रॉडपासून सावध रहा


फसवणुकीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहिले पाहिजे. ऑलाईन ट्रांझिक्शन करताना  मोबाईलवर आलेला OTP अज्ञान व्यक्तीसह शेअर करु नका. मोबाईलवर आलेल्या संशयस्पद लिंकवर क्लिक करु नका. UPI  पासवर्ड, क्रेडिट कार्ड तपशीलकुठेही शेअर करु नका.