गुरूग्राम : गुरूग्रामच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटलने एक मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना  सोपवताना खूप निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने शोकाकूल कुटुंबाला दुसऱ्या पुरूषाचा मृतदेह सुपूर्द केला. याचा खुलासा अत्यंविधी करण्यासाठी गेले असता मृतदेहाची चादर हटविल्यावर झाला. 


दैनिक भास्करने दिलेल्या बातमीनुसार उत्तर प्रदेशातील कासगंजच्या ५० वर्षीय मंगो देवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा इलाज करण्यासाठी त्या सेक्टर -९ येथील ईएसआईसी हॉस्पीटलमध्ये सुरू होता. २० नोव्हेंबरला त्यांना गुडगावच्या साऊथ सिटीच्या पार्क हॉस्पिटलला रेफर करण्यात आले. मंगळवारी  रात्री उशीरा त्यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांचा ३० वर्षीय मुलगाही होता. 


रात्री एक वाजता हॉस्पीटलने मृतदेह नेण्यास सांगितले. याचवेळी हॉस्पिटलने निष्काळजीपणा केला. हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी महिलेऐवजी पुरूषाचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये ठेवला.