लखनौ : गुटखा गाण्याची सवय किती वाईट आहे, या सवयीचा तरूणींना किती तिरस्कार आहे, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे, नवरदेवाला वधूने रंगेहाथ गुटखा खातांना पकडलं आणि तिने कोणताही विचार न करता, एका फटक्यात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना, उत्तर प्रदेशातील बल्लिया जिल्ह्यातल्या मुरारपट्टी गावातील आहे. मंडपात प्रवेश करतानाच वधूने आपल्या होणाऱ्या पतीला गुटखा खाताना रंगेहाथ पकडलं, यानंतर तिने तातडीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. वधूच्या धाडसी निर्णयामुळे वऱ्हाडीही अवाक झाले आहेत, मात्र तिचं काही लोकांनी नंतर कौतुक देखील केले.


या निर्णयावरून सुरुवातीला वधूचे मित्रमंडळ आणि नातेवाईकांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाच्या विनंतीला मान न देता वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे वरपक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली.


पोलीस अधिकाऱ्यांनी याविषयी तिला विचारणा केली असता, गुटख्याचं व्यसन असलेल्या व्यक्तीशी आपण लग्न करणार नसल्याचं या तरूणीने सांगितलं.