ग्वालियर : बुधवारी संध्याकाळी एका प्रॉपर्टी डिलरची अमानुषपणे हत्या करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन बाईकवरून ४ - ५ लोकांनी बाजारात या प्रॉपर्टी डिलरवर चाकूचे वार केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या डिलरवर गोळी देखील झाडली. त्यानंतर पुन्हा रस्त्यावर पडलेल्या त्या डिलरवर चाकूने पुन्हा एकदा वार केले. या घटनेनंतर ते आरोपी हत्यारं घेऊन पसार झाली. मृत डिलरच्या घरी एक रिसेप्शन होतं आणि त्याच्या तयारीसाठी ही व्यक्ती बाजारात गेली होती. 


काय आहे हा प्रकार? 


हत्येचा हा पूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस व्हिडिओ फुटेजद्वारे आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, त्यांना आरोपींची ओळख पटली आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वावियरमध्ये गजबजलेल्या या बाजारात बुधवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. जितेंद्र बाथम स्कूटरवर सवार होऊन कुठे तरी जात होता. जितेंद्र या प्रॉपर्टी डिलरच्या घरी त्याच्या चुलत भावाचं लग्न आहे. सिंधी 


धर्मशालाजवळ हे आरोपी पहिल्यापासून उभे होते. या हत्येचा कट पूर्वीपासून रचण्यात आला होता.