Mobile charger hacking : तुमच्या मोबाईलच्या चार्जरमधून तुमचा डेटा हॅक होऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय. फोन लॅपटॉप किंवा डिव्हाईसशी जोडलेला असेल आणि त्याचवेळी जोडलेल्या डिव्हाईसमध्ये व्हायरस असेल तर धोका अधिक आहे. युएसबी अर्थात चार्जर सॉकेटद्वारे तुमचा डेटा हॅक होऊ शकतो. असा मेसेज व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. अशाच पद्धतीने एकाच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. त्यामुळे या बातमीची पोलखोल करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला.


पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात...


  • मोबाईल चार्जर, यूएसबी क्वॉडमध्ये एक चिप बसवलेली असते

  • या चिपमध्ये मालवेअर इन्स्टॉल केलेला असतो

  • याद्वारे तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा हॅक होऊ शकतो

  • पब्लिक प्लेसवर यूएसबी पोर्टवर चार्जिंग करणं टाळावं



तुम्ही मोबाईलची चार्जिंग सुरक्षित ठिकाणीच करा. चार्जरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधला डेटा हॅक होऊ शकतो हे आमच्या पडताळणीत सत्य ठरलंय.