हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याच मुख्यमंत्री योगींचं आश्वासन
योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या शहरांची नाव बदलण्याचा धडका लावलाय.
तेलंगणा : तेलंगणाच्या निवडणूकीत आता प्रचाराचा ज्वर चढू लागलाय. हैदराबादमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत सत्तेत आलो तर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजापाचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी रविवारी दिलं. योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या शहरांची नाव बदलण्याचा धडका लावलाय.
चौफेर टीका
नुकतंच अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं. तर फैजाबाद जिल्ह्याचं नाव अयोध्या करण्यात आलं. देशभरात नामांतराच्या निर्णयावरून चौफेर टीक सुरू असतानाच, रविवारी योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणाच्या राजाधानीचंही नामांतर करण्याची घोषणा करून टाकली.
ओवेसींचा टोला
लगोलग एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्त्युतर दिलं. ज्यादिवशी माझ्या वडिलांनी या देशात जन्म घेतला, त्या दिवशीपासून हा देश माझ्या बापाचा झाला असा टोला ओवेसींनी हाणला.