Shocking Story :लहान मुलांकडे कितीही लक्ष दिले तरी ते खोड्या करण काही सोडत नाही. कधी कधी याच खोड्या जीवघेण्या देखील ठरतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिमुकल्याला खेळता खेळताना फास लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले होते. त्यामुळे या घटनेने कुटूंबीय हादरलं असून परिसरात शोककळा पसरली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहदा कोतवाली परिसरातील मदारपूर गावात वाहिद कुटूंब राहते. गुलाब वाहिद यांचा 7 वर्षीय मुलगा अयान हा त्याच्या मित्रांसोबत (Friends) खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याच्या गळ्याला फास लागला. या फासामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटूंबियांनी वेळीच देऊन सुद्धा त्याचे प्राण वाचले नाही. 


खरं तर सात वर्षाच्या अयानने खेळता खेळता पोत्याच्या सुतळीतून एक फास काढला आणि खोलीतल्या खुंटीला बांधून तो झुलू लागला. यावेळी झूलताना त्याच्या गळ्याला फास आवळला गेला आणि त्याचा जागीच जीव गेला. दरम्यान अयानची बिकट अवस्था पाहून त्याच्या मित्रांनी याची मा्हिती कुटूंबियांनी दिली. यावेळी घाईघाईत आईने अयानला खुंटीवरून ओढून सामुदायिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले.ही बातमी ऐकून मुलाची आई बेशुद्ध झाली. त्याचवेळी या घटनेमुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


दरम्यान ही घटना उत्तरप्रदेश (Uttar pradesh) राज्यात घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.