मुंबई : jet airways जेट एरवेजमध्ये काम करणाऱ्या आणि सध्याच्या घडीला मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जेट एअरवेजमध्ये काम करणाऱ्या कर्मचांऱ्यांना सध्या आधार मिळाला आहे, तो विस्तारा एअरलाईन्सचा. सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेअंतर्गत विस्तारा ही जेट एअरवेजच्या एकूण १०० वैमानिकांना आणि जवळपास ४५० केबिन क्र्यू मेंबर्सना सेवेत रुजू करण्याचं पाऊल उचलण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिश्चित काळांसाठी जेट एअरवेजची उड्डाणं रद्द झाल्यानंतर आता या क्षेत्रात Skilled work force ची नियुक्ती करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. यामध्ये परवानाप्राप्त गटातील वैमानिक, अभियांत्रिक आणि केबिन क्र्यू स्टाफचाही समावेश आहे. १७ एप्रिलपासून जेट एअरवेजकडून अनिश्चित काळासाठी आपली उड्डाणं रद्द केली होती. ज्यामुळे जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली होती. ज्यामध्ये जवळपास १ हजार ३०० वैमानिक आणि २ हजार केबिन क्र्यूचा समावेश आहे. 


स्पाईसजेटकडून ५०० कर्मचाऱ्यांची भरती 


मंगळवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विस्ताराकडून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. टाटा आणि सिंगापूर एअरलाईनच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आणि गुरुग्राम येथे ही भरती पार पडली. यासंबंधी विस्ताराच्या प्रवक्त्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी स्पाईसजेटनेही जेट एअरवेजच्या एकूण ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली असून, यामध्ये १०० वैमानिकांचा समावेश आहे. त्यामुळे स्पाईस जेट हे एक प्रकारे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी तारणहार ठरलं आहे असं म्हणायला हरकत नाही.