शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...
शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...
मुंबई : जगात काही लोक असे असतात की, ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. पण, त्यांचे कार्यच इतके अफाट की, लोक स्वत:हून त्यांचा संबंध जोडतात. आता शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. तिघेही कोणत्याच कारणाने एकमेकांशी संबंधीत असण्याचे कारण नाही. कारण शरद पवार हे पडले राजकीय व्यक्तीमत्व. आता रजनीकांत आणि भरत जाधव अभिनय क्षेत्रात आहेत. मात्र, दोघांचीही काम करण्याची ठिकाणे वेगळी. भरत जाधव महाराष्ट्रातला मराठी स्टार तर, रजनीकांत दक्षिणेतला स्टार. मग या तिघांमध्ये साम्य काय?
राजकारणाचे चालते बोलते विद्यापिठ
या तिघांमधले साम्य असे की, तिघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री, संसदेतले विरोधी पक्षनेतेपद आणि याचसोबत असंख्य पदे भूषवणाऱ्या शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबरत 1940 मध्ये पुणे येथील बारामतीमध्ये झाला. लोकशाहीप्रधान असलेल्या आपल्या देशातील सार्वजनिक जीवनातील कोणतीच निवडणूक पवार आता पर्यंत हारले नाहीत. वयाची पंचाहत्तरी पूर्ण करूनही शरद पवारांचा उत्साह आजही तरूणांना लाजवेल असा आहे. आज ते वयाची 78 वर्षे पूर्ण करून 79व्या वर्षात पदार्पण करतील. पवारांचा व्यासंग दांडगा आहे. भ्रमंती, प्रचंड जनसंपर्क आणि वाचनाचा दांडगा आवाका, ही पवारांच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द ही मोठी संघर्षपूर्ण राहिली आहे. बंडखोर वृत्तीचे असलेले पवार हे सध्या त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाचे प्रमुख आहेत. असे म्हणतात की, शरद पवारांना सोडून सत्ता कुठेच जात नाही. विरोधात असतानाही शरद पवार सत्तेचा उपभोग घेऊ शकतात हीच त्यांच्या व्यक्तीमत्वाची खासीयत आहे.
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत
रजनीकांत हे नावच त्यांची ओळख करून द्यायला पुरेसे आहे. त्यांना ‘दक्षिणेतील देव’ म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारत ही जरी रजनीकांत यांची कर्मभूमी बनली असली तरी, ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत. शिवाजी गायवाड असे त्यांचे मुळ नाव. तर, जेजुरी जवळील कडेपठार हे रजनीकांत यांचं मूळ गाव. पण, वडील पोलिस दलात नोकरीला असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. बदली होऊन ते बंगलोरला आले आणि दक्षिण भारत ही ‘दि रजनीकांत’ यांची कर्मभूमी बनलली. आज ते तिथले मोठे स्टार आहेत. रजनीकांत यांचे आईवडील घरात मराठी तर, बाहेर कन्नड बोलंत असंत. १२ डिसेंबर १९५० मध्ये रामोजी राव आणि रमाबाई यांच्या पोटी बंगळुरूत त्यांचा जन्म झाला.
विनोदी अभिनेता भरत जाधव
भरत जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक अलिकडचे आणि महत्त्वाचे नाव. खरेतर या नावाची मराठी चित्रपटसृष्टीला काहीशी उशीराच ओळख झाली. चित्रपटात येण्यापूर्वी हे नाव नाट्यसृष्टीत प्रचंड लोकप्रिय होते. भरत जाधव अलिकडील काळात चित्रपटात काम करत असला तरी नाट्यसृष्टीशी त्याची नाळ अद्यापही कायम आहे. ऑल दी बेस्ट नाटकातून खऱ्या अर्थाने अभिनयाची झलक दाखवणारा हा अभिनेता आजही नाटकात रमतो. मराठीतील प्रथीतयश लेखक वसंत सबनीस यांचे सौजन्याची ऐशीतैशी या नाटकातून सध्या तो प्रक्षकांच्या भेटीला येत आहे.”सही रे सही” “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट”, आणि “आमच्यासारखे आम्हीच” ही त्याची प्रसिद्ध नाटके आहेत. 12 डिसेंबर 1973 या दिवशी भरत जाधवचा जन्म झाला.