नवी दिल्ली : साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे घडलेली घटना तुम्हाला कळल्यावर कदाचितच तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...


हरदोईत घडला विचित्र प्रकार


हरदोई येथील एका शेतकऱ्याला साप चावला आणि त्यानंतर विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्याला साप चावल्यानंतर त्याने सापाच्या तोंडाला चावा घेतला. 


शेतात काम करताना सापाने घेतला चावा 


हरदोईमधील माधौगंज पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी हा आपल्या शेतात काम करत होता त्याचवेळी एका सापाने त्याला चावा घेतला. त्यानंतर हा शेतकरीही सापाला चावला.



शेतकऱ्याचे प्राण वाचले हा एक चमत्कारच- डॉक्टर


या घटनेनंतर तात्काळ शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शेतकऱ्याला पाहताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनाही विश्वास बसला नाही की, सापाने चावा घेतल्यानंतरही शेतकरी सुखरुप आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याची प्रकृती उत्तम असल्याचं घोषित करण्यात आलं.


डॉक्टर संजय कुमार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अशा प्रकारची घटना प्रथमच समोर आली आहे. या शेतकऱ्याच्या शरीरातील प्रतिरोधक क्षमता फारच जास्त होती त्यामुळे त्याला कुठल्याच प्रकारचं नुकसान झालं नाही. शेतकरी सुखरुप आणि स्वस्थ आहे हा एक चमत्कारच म्हणावं लागेल.