सेक्स रॅकेटचा भांडाफोड, परदेशी महिला अटकेत
हरियाणातील गुरुग्राम येथे सेक्स रॅकेटचा फांडाफोड करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम येथे सेक्स रॅकेटचा फांडाफोड करण्यात आला आहे.
एका स्पा मध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी रविवारी छापा टाकत कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेक्टर-५३ मधील गोल्फ कोर्स रोडवर असलेल्या सेंटर प्लाझा मॉलमधील औवा थाई स्पा वर छापा टाकण्यात आला.
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीसह सहा महिलांना हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधिकारी रविंद्र कुमार यांनी आयएएनएसला माहिती देताना सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक थायलंड आणि दुसरी केनियातील महिला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी गुरुग्राममध्येच अशा प्रकारे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी २९ जुन रोजी शॉपिंग मॉलमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत १० महिलांना अटक केली होती.
तर, जानेवारी महिन्यात डीएलएफ २ परिसरात आणि एका शॉपिंग मॉलमध्ये छापा टाकत पोलिसांनी १४ महिला आणि चार पुरुषांना अटक केली होती.