गरूडाच्या वेशात माणूस की मानवासारखा दिसणारा गरूड, नक्की खरं काय? सोशल मीडियावर फोटो वायरल
तुम्ही रामायणाच्या कथेत जटायू पक्ष्याबद्दल ऐकलंच असेल. जटायूने माता सितेला वाचवण्यासाठी प्राण दिले होते. जगात असे अनेक मोठे पक्षी आहेत. ज्यांचा आकार पाहूनच मानवाला धडकी भरते. गरुडांमध्येही असाच एक प्रकार म्हणजे हर्पी गरूड होय.
Viral Bird : तुम्ही रामायणाच्या कथेत जटायू पक्ष्याबद्दल ऐकलंच असेल. जटायूने माता सितेला वाचवण्यासाठी प्राण दिले होते. जगात असे अनेक मोठे पक्षी आहेत. ज्यांचा आकार पाहूनच मानवाला धडकी भरते. गरुडांमध्येही असाच एक प्रकार म्हणजे हर्पी गरूड होय.
हर्पी गरूड हा पक्षी ब्राझिलमध्ये आढळून येतो. गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर हर्पी गरूडाचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यास असा भ्रम होतो की, एखाद्या मानवाने गरूडाचा वेश धारण केला आहे. परंतू तसे नसून हा खरोखर गरूड आहे. हर्पी गरूड ही ब्राझिलमध्ये सापडणारी विशेष जात आहे.
तो पक्षी आहे की माणूस, तुम्हाला काय वाटतं? बर्याच लोकांचं मत आहे की हा कोणीतरी मानव आहे, ज्याने पक्ष्यासारखा पोशाख घातला आहे. चित्रातील भावही माणसांशी जुळणारे आहेत. सध्या सोशल मीडियावरही हीच चर्चा रंगली आहे. बरेच युजर्स पक्षी मानायला तयार नाहीत!
हा फोटो 7 महिन्यांपूर्वी फेसबुकवर पोस्ट करण्यात आला होता. यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. फेसबुकवर टाकलेल्या मूळ पोस्टनुसार हा गरुड हर्पी ईगल नावाचा पक्षी आहे. जगातील चार सर्वात मोठ्या पक्ष्यांमध्ये याची गणना केली जाते. हर्पी गरुड 2 मीटर रुंद आणि 1.2 मीटर उंच असू शकतो.
या पक्ष्याचे पंजे 3 ते 4 इंच असतात, जे अस्वलाच्या पंज्यांपेक्षा मोठे असतात. त्यांचे पंख 7.5 फूट लांब असू शकतात. या गरूडाचा आकारमान, चोच, नखं पाहता एखाद्या कमजोर मानवाची किंवा प्राण्याची सहज शिकार करू शकतात.