Viral Video: भारतातील लोक आणि जुगाड याचा काही नेम नाही. देशात जुगाडू लोकांची कमतरता नाहीये. लोक असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकले नाही. नक्की काय आहे का व्हिडिओ पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरपीजी ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर भारतातील नळ, जुगाड असं कॅप्शन दिले आहे. हर्ष गोयंका यांनी व्हिडिओ ट्विट करताच सोशल मीडियावर अनेकांची त्यावर कमेंट करुन हा जुगाड भन्नाट असल्याचे मत दिले आहे. 


व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिसत आहे की, एका पाइपला रिकामी टुथपेस्ट जोडलेली दिसत आहे. तर, टुथपेस्टचे झाकण उघडताच पाणी येताना दिसत आहे. समोरच एक पाण्याची बादली ठेवलेलीही दिसत आहे. टुथपेस्टचे झाकण बंद केल्यास पुन्हा पाणी येणे बंद होत आहे. थोडक्यात काय तर, रिकाम्या टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करण्यात आला आहे. 


एक टाकी दिसत असून त्यात पाणी साठवण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. सोबतच एक पाइपही आहे. मात्र, या टाकीचा नळ तुटला असण्याची शक्यता आहे. त्यामुळंच रिकाम्या टुथपेस्टचा वापर नळ म्हणून केला आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर गरजेच्या कामासाठी केल्याचे पाहून हर्ष गोयंकाही खुश झाले आहेत. त्यांना हा जुगाड फारच आवडला आहे. 


हर्ष गोयंका यांनी पोस्ट केलेला या व्हिडिओला 67 हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. तर, आत्तापर्यंत जवळपास 700हून जास्त लाइक्सदेखील आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे मत व्यक्त केले आहे. 



एका युजर्सने म्हटलं आहे की, काम करा> रीसायकल> पुन्हा उपयोग करा #jugaadसोबतच सगळ्यात बेस्ट काम, तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे हेच भारताचे सौंदर्य आहे, कमीत कमी वस्तूंमध्ये मोठा फायदा. तिसऱ्याने म्हटलं आहे की, गरज ही शोधाची जननी आहे, हे खरंच आहे. तर, आणखी एका युजरने म्हटलं आहे की, उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून अधिक उपयोग करणे.