हैदराबाद : 18 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये आयुष्य काढलेल्या 65 वर्षीय हसीना बेगम (hasina begum)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. भारतात परतल्यावर स्वर्गात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली केली होती. एक घर बांधण्याचे सुद्धा त्यांचं स्वप्न होतं... मात्र पाकिस्तानातून परतल्यापासून त्यांची तब्येत खालवली होती.  मायदेशात परतल्यावर जीव गेला तरी चालले असं त्या अनेकदा म्हटल्या होत्या..  अखेर देशात पोहोचताच काही दिवसातच त्यांची प्राणज्योत मालवली... किमान परकीय देशाच्या जोखडातून मुक्त झाल्यावर मृत्यू झाला याच तरी समाधान त्यांना मिळेल हेच म्हणावं लागेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमधील रशदपुरा येथील त्या रहिवाशी होत्या. भारतात आल्यानंतर त्यांचा अवघ्या १५ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मायभूमीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वारस कोणीही नसल्याने त्यांच्यावर काही नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी दफनविधी केला. पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पाकिस्तानात गेल्या होत्या. पण त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना 18 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये राहावं लागलं. औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नांनी प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या होत्या. 



हसीना बेगम भारतात परतल्या मात्र येथेही त्यांच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत. त्यांचा प्लॉटच भूमाफियांनी बळकावला. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.