Hathras Case : भाजप आमदार म्हणतात;`चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात`
मुलींच्या पालकांनी चांगले संस्कार मुलींना द्यायला हवेत
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या हाथरस आत्महत्या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केलं आहे. बलियाच्या बेरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हणलंय की,'सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील.' आमदारांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा आहे.
सुरेंद्र सिंह यांना पत्रकारांना हाथरस प्रकरणावर प्रश्न विचारला. पत्रकारांनी विचारलं की,'असं म्हटलं जातंय की हे रामराज्य चालू आहे. या रामराज्यात बलात्कारासारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. याचं काय कारण आहे.'
भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. “मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात.
गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे” असं भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.