हाथरस : SIT करणार चौकशी, `निर्भया`प्रकरणातील वकील लढणार केस
हत्याकांड घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय.
हाथरस : देशाला हादरवणाऱ्या हाथरस गॅंगरेप आणि हत्याकांड घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या तपासासाठी ३ सदस्यीय टीम हाथरस येथे पोहोचली आहे. यामध्ये महिला अधिकारी देखील आहे. मानवाधिकार आयोगने याप्रकरणी मुख्य सचिव आणि डीजीपीला नोटीस पाठवली आहे.
सात दिवसात अहवाल
एसआयटीला ७ दिवसात आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलंय. परिस्थितीचे गांभीर्य पाहता यूपी सरकारने तपासासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष टीम तयार केली आहे. लवकर न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल. याप्रकरणी एका याचिकेवर आज इलाहाबाद हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
निर्भया केसमधील वकील लढणार
हाथरस पीडितेची केस निर्भयाला न्याय देणाऱ्या वकील सीमा कुशवाहा लढणार आहेत. आज हाथरस येथे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. निर्भया प्रकरणात सीमा कुशवाह यांच्यामुळे दोषींना शिक्षा झाली. त्यामुळे त्यांनी जर हे प्रकरण हाती घेतलं तर पीडितेला लवकर न्याय मिळू शकतो असं म्हटलं जातंय.
दिल्लीतून मोठ्या संरक्षणात मुलीचा मृतदेह आणि तिचे नातेवाईक सफदरजंग रूग्णालयातून नेला. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार (Hathras gang rape Victim) करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केले. नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली.
पंतप्रधानांनी घेतली दखल
उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार (Hathras gang rape Victim) करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका
काल मध्यरात्री दिल्लीतून मोठ्या संरक्षणात मुलीचा मृतदेह आणि तिचे नातेवाईक सफदरजंग रूग्णालयातून निघाले. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.