लखनऊ : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोकुळाष्टमी रस्त्यावर होणाऱ्या सेलिब्रेशनची जोरदार पाठराखण केलीय. जर रस्त्यावरची नमाझ आपण थांबवू शकत नाही, तर जन्माष्टमीचं सेलिब्रेशन कुठल्या आधारे थांबवायचं, असा सवाल योगींनी विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात योगी बोलत होते.  यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित होते. ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. 


आधीच्या समाजवादी पार्टीच्या सरकारला टोला लगावताना स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती, असे ते म्हणाले. योगींच्या या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे. योगी यांनी आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला.