नवी दिल्ली : मुंग्यांवर अनेक छोट्या मोठ्या कविता तुम्ही वाचल्या असतील. त्यांच्या एका रांगेत चालण्याची कला आपल्याला भुरळ घालते. मुंग्याची शिस्त आणि मेहनत कौतुकास्पद असते. परंतु लोकांना माहितच नसते की, मुंग्या एका सरळ रेषेत कशा चालतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंग्यांमध्ये एक विशेष प्रकारचे फिरोमोन्स नामक केमिकल असते. या केमिकलच्या मदतीने मुंग्या आपसांत संपर्कात राहतात. सर्वात पुढे चालणाऱ्या मुंगीला धोका असल्याचे लक्षात आल्यास या केमिकलच्या द्वारे ती इतर मुंग्यांना अलर्ट करते. अशाच प्रकारचे मुंग्यांना कोणताही धोका वाटल्यास ते या केमिकलद्वारे दुसऱ्या मुंग्यांना अलर्ट करीत राहतात.


मुंग्यांना खाद्य किंवा अन्य रिसोर्सच्या बाबत माहिती झाल्यास फिरोमोन्स लिक्विडच्या मदतीने निशान सोडत असते.  त्यामुळे सर्व मुंग्यांना सोबत चालण्यास मदत होते.


जगभरात मुंग्यांच्या 12000 पेक्षा अधिक प्रजाती आहे. मुंगी आपल्या वजनाहून 20 पट अधिक वजन उचलू शकते. तसेच मुंग्या कधीही झोपत नाही असे म्हटले जाते. मुंग्यांच्या झुंडीत एक राणी मुंगी असते. जिचे वय 30 वर्ष इतके असते.