देशातील प्रमुख ब्रॅन्डसमध्ये या कंपनीनं पटकावलाय पहिला क्रमांक
एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय.
मुंबई : एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय.
तर नवी कंपनी असलेली रिलायन्स जिओनं पहिल्याच वर्षी या यादीत ११ वं स्थान पटकावलंय. रिसर्च कंपनी कँटर मिलवार्ड ब्राऊनच्या 'टॉप ५० मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रॅन्डस २०१७'ची यादी जाहिर केलीय.
या अहवालात एचडीएफसीनं २०१४ पासून सलग आपल्या ब्रॅन्ड व्हॅल्यूमध्ये प्रगती केल्याचं आणि आपल्या सेवा अधिक चांगल्या बनवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं गेलंय. खाजगी क्षेत्रातील या बँकेची ब्रॅन्ड व्हॅल्यू २०१४ साली ९.८ अरब डॉलर होती... ती आत्ता वाढून १८ अरब डॉलरपर्यंत पोहचलीय.
या यादीत यंदा नव्यानं सामील झालेल्या अनेक नावांमध्ये रिलायन्स जिओचंही नाव आहे. याशिवाय डीमार्ट, व्हर्लपूल, बजाज आलियांज, कॅनरा बँक, सन डायरेक्ट आणि डिश टीव्ही यांचाही समावेश आहे.