HDFC-HDFC Merger: HDFC च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचंही खातं या बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेडच्या (HDFC Limited) विलिनीकरणाची तारीख समोर आली आहे. 1 जुलै 2023 पासून हा निर्णय प्रभावित होणार आहे. एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख (HDFC Group Chairman Deepak Parekh) यांनी मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे. 


13 जुलैपासून स्टॉक डिलिस्टिंग प्रभावित होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितलं की, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणासाठी 30 जूनला मार्केट बंद झाल्यानंतर बैठक होणार आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सीईओ केके मिस्त्री यांनी सांगितल्यानुसार, 13 जुलैपासून एचडीएफसी स्टॉक डिलिस्टिंग ((HDFC Stock Delisting)  प्रभावित होणार आहे. याचा अर्थ 13 जुलैला ग्रुपच्या हाऊसिंग फायनान्स फर्मचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून हटतील. 


30 जूनला दोन्ही कंपन्यांच्या बोर्डांची बैठक


एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं विलिनीकरण झाल्यानंतर HDFC बँक जगातील पाचवी मौल्यवान बँक होईल. एप्रिल 2023 पर्यंत एचडीएफसी बँक जगात मार्केट कॅपच्या हिशोबाने 11 व्या क्रमांकावर होती. बिजनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जूनला मार्केट बंद झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या बोर्डाची बैठक होईल आणि विलिनीकरणावर शिक्कामोर्तब केलं जाईल. 


एचडीएफसी बँकेने गतवर्षी 4 एप्रिल 2022 पर्यंत एचडीएफसी लिमिटेडचं अधीग्रहण करण्यासाठी सहमती दर्शवली होती. ही तब्बल 40 अरब डॉलर्सची डील होती. प्रस्तावित युनिटची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपये असेल. 


एचडीएफसी बँकेत 100 टक्के वाटा भागधारकांचा असणार आहे. तर एचडीएफसीच्या सध्याच्या भागधारकांकडे बँकेचा 41 टक्के वाटा असेल. एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील.


दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ


कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलताना दीपक पारेख यांनी सांगितलं की, 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या प्रत्येक कर्चमाऱ्याला सहभागी करुन घेतलं जाणार आहे. एचडीएफसी बँकेला आमच्या लोकांची गरज असेल. दरम्यान, विलिनीकरणाच्या घोषणेनंतर दोन्ही कंपन्यांचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले आहेत. 


तथापि, शेअर बाजार बंद होण्याआधी HDFC लिमिटेडचे ​​समभाग 1.33 टक्क्यांनी वाढून 2,761.60 रुपयांवर बंद झाले, तर HDFC बँक लिमिटेड 1.39 टक्क्यांनी वाढून 1,658.25 रुपयांवर बंद झाले.