मुंबई : देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट (आरपीएलआर) वाढवला. HDFC ने RPLR 0.25% ने वाढवला आहे. नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. RPLR हा दर आहे ज्यावर HDFC गृहकर्ज दर बेंचमार्क केले जातात. (HDFC hikes lending rate by 25 bps)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. व्याजदरात या वाढीमुळे एचडीएफसीकडून गृहकर्ज घेणाऱ्यांवर बोजा पडणार आहे. लोकांचा EMI वाढणार आहे.


एचडीएफसीने सांगितले की, "एचडीएफसीने गृह कर्जावरील किरकोळ प्राइम लेंडिंग रेटमध्ये वाढ केली आहे. हा असा दर आहे ज्यावर अॅडजस्टेबल रेट होम लोन्स (एआरएचएल) बेंचमार्क केले जातात. दर 25 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. नवीन दर 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल."


यापूर्वी 9 जून रोजी देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनीने आरपीएलआरमध्ये 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. यापूर्वी 1 जून रोजी 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. 2 मे रोजी 5 बेसिस पॉईंटने आणि 9 मे रोजी 0.30 टक्क्यांनी दर वाढवण्यात आला होता. 


HDFC रिटेल प्राइम लेंडिंग रेटमधील ही नवीनतम वाढ कर्जदारांसाठी गृहकर्ज EMI रक्कम वाढवेल.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीच्या काही दिवस आधी HDFC ने व्याजदरात ही वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या एमपीसी बैठकीत महागाई रोखण्यासाठी रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या 


या आढावा बैठकीत, RBI चे रेट सेटिंग पॅनेल मुख्य रेपो रेट 0.35 ते 0.50% ने वाढवू शकते. MPC ने महागाई नियंत्रित करण्यासाठी मे आणि जूनमध्ये लागोपाठ दोन टप्प्यांत 0.90% ने वाढ केली आहे, रेपो रेट 4.90% वर नेला आहे.