तिरुवअनंतपूरम : ते दोघेही बालपणीचे मित्र.. एकमेकांना खूप पसंद करत होते. पण.. कधी सांगितले नाही. आईवडिलांचा विरोध होईल म्हणून त्यांनी आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठरवलं. त्या दोघांनीही आपलं क्षेत्र राजकारण निवडलं.. तो आमदार झाला आणि ती महापौर... आता कुणाचाही विरोध नाही. कारण दोघेही आपापल्या स्थानी योग्य... आता त्या दोघांनी एकत्र येण्याचा, एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणाच्या राजपथावर त्यांनी केली आयुष्यभरासाठी आघाडी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यभरासाठी आघाडी करणारी ही जोडी आहे सचिन देव आणि आर्या राजेंद्रन. स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या ( FSI ) कार्यामुळे हे दोघेच अधिक जवळ आले. सचिन देव हे FSI चे राज्य सचिव आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ( CPM ) च्या तिकिटावर बालुसेरी (SC) मतदारसंघातून निवडणूक लढविली. या निवडणुकीत 20,000 हून अधिक मतांच्या फरकाने ते निवडून आले होते.


२०२० मध्ये केरळच्या स्थानिक संस्थांची निवडणूक झाली. तिरुवअनंतपूरम महापालिकेच्या निवडणुकीत सीपीएम आणि डीएलएफ या पक्षांची आघाडी झाली. यात निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आर्या राजेंद्रन निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्ष होते. तिरुवनंतपुरमच्या ऑल सेंट्स कॉलेजमध्ये त्याचवेळेस शिक्षणही सुरु होतं. 



निवडून आल्यानंतर आर्या राजेंद्रन यांना एके दिवशी अचानक कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिवालयातून फोन आला. पक्षात एका प्रतिष्ठित पदाची त्यांना ऑफर दिली गेली. त्यांना हा सगळा विनोद वाटला. पण, जेव्हा तिरुअनंतपुरमच्या महापौरपदासाठी त्यांचं नाव जाहीर झालं तेव्हा त्यांना धक्काच बसला.


जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या यांना महापौरपदाची शपथ दिली आणि २१ वर्षीय आर्या या देशातील सर्वात तरुण महापौर बनल्या. आर्या या मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील इलेक्ट्रिशियन असून आई एलआयसी एजंट आहे.


सर्वात कमी वयाचे असलेले आमदार सचिन देव आणि देशातील सर्वात तरुण महापौर आर्या यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.