दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. दुसऱ्या कोरोना लाटीचा संसर्ग फार जलद गती ने होत आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली सरकारने आठवडाभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन पुढील सोमवार म्हणजे 26 एप्रिलपर्यंत सुरू राहील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे दारूच्या दुकानांवर लोकांची गर्दी होऊ लागली आहे. सध्याच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी लोक काळजी घेत आहेत. काही लोक कोरोना लस घेत आहेत, तर काही कोरोनापासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी इतर खबरदारी घेत आहेत. परंतु दिल्लीतील शिवपुरी गीता कॉलनी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे दारू खरेदीसाठी दुकानात आलेल्या एका महिलेने एक विचित्र गोष्ट सांगितली.


एका मीडियातील व्यक्तीने त्या महिलेला विचारले, तुम्ही दारु घ्यायला का आलात? तेव्हा ती महिला म्हणाली की, "इंजेक्शनचा कोणताही फायदा होणार नाही, या उलट दारुनेच फायदा होईल." त्या महिलेने सांगितले की, जितकी जास्त दारु विकली जाईल, तितकी लोकं ठीक राहतील.



या महिलेच्या मते लॉकडाऊनचा परिणाम मद्यपान करणाऱ्यांवर होईल. आम्हाला औषध नव्हे (कोरोना लस). दारुच ठिकं करेल. एवढेच नाही तर या महिलेने असेही म्हटले की, "मी 35 वर्षे झाली दारू पित आहे. मी याशिवाय इतर कोणताही डोस घेतला नाही." लॉकडाऊन विषयी बोलताना या महिलेने पुढे सांगितले की, ''बस दारुचे ठेके सुरू ठेवा."