नवी दिल्ली : दिल्लीत आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसेत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला. रतनलाल यांच्यावर त्यांच्या राजस्थानातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी तिहावली या त्यांच्या गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेल्या रतनलाल यांच्या अशा मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळलाय. तर पोलीस दलात आणि त्यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन लाल होळीसाठी गावी जाणार होते, मात्र त्यांच्या अशा अचानक मृत्यूने त्यांच्या ७० वर्षीय आईवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. तीन भावांमध्ये रतनलाल सर्वात मोठे होते. १९९८ मध्ये ते दिल्ली पोलिसांत सेवेसाठी दाखल झाले होते.आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.  


देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेत शहीद पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचं कुटुंब उपोषणाला बसलं आहे. कुटुंबाची मागणी आहे की, रतनलाल यांना 'शहीद' झाल्य़ाचा दर्जा मिळावा. दिल्लीच्य़ा भजनपुरामध्ये झालेल्या हिंसेत रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. ते राजस्थानच्या सीकरचे राहणारे होते.


गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात शहीद झालेल्या हेड काँन्स्टेबल रतन लाल यांच्या पत्नीला पत्र लिहून शोक व्यक्त केला. अत्यंत दु:खद प्रसंगात सपूर्ण देश आपल्या कुटुंबासोबत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.



<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0"allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>