हैदराबाद : शाळेच्या मुख्याध्यापकाने  विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे.  फळ्यावरील शब्द वाचता न आल्याने दुसरीत शिकणाऱ्या  ७ वर्षीय विद्यार्थ्याच्या पाठीवर माराचे व्रण उठले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या प्रकरणी मुख्याध्यात्री  सुरेश सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या पालकांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या मुख्याध्यापकावर भारतीय दंड विधानाच्या कलम 341 आणि 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


अद्यापपर्यत या मुख्याध्यापकाला अटक  न आल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्येही घटना आहे, विद्यार्थ्याला जास्तच मारल्यानंतर, अधिकच घाबरलेल्या मुलाने आपण वाचू शकत नसल्याचे मुख्याध्यपकांना सांगितले.


 मुलगा अर्धमेला झाल्यानंतर सिंग वर्गाबाहेर निघून गेले. शाळा सुटल्यानंतर मुलाने झालेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.