Heart Attack Video: स्टेजवर नाचता नाचता हार्ट अटॅक, विवाह सोहळ्यात पसरली शोककळा
लग्नात नाचत असताना अचानक तो खाली कोसळला. अनेकांना आधी काही कळलंच नाही. पण तो जग सोडून निघून गेला होता.
मुंबई : लग्नात नाचण्याचा मोह अनेकांना असतो. त्यामुळे अनेक जण बिनधास्त नाचत असतात. लग्न हा एक आनंदाचा क्षण असतो. पण या आनंदाच्या क्षणात काही चुकीचं घडलं तर मग आनंद दु:खात बदलतं. राजस्थानमधील (Rajasthan) पाली जिल्ह्यात एका लग्न समारंभात अशीच एक घटना घडली आहे. स्टेजवर नाचत असताना 40 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. नाचत असताना तो खाली पडला. सुरुवातीला लोकांना वाटलं की, ते डान्सची स्टेप आहे की काय. पण नंतर ते उठलेच नाही.
लोकांनी ताबडतोब त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. पण त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं. शिक्षक असलेल्या या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला. या घटनेचा (Heart Attack Video) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलीम पठाण असं या व्यक्तीचं नाव आहे. शुक्रवारी रात्री ते कुटुंबीयांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. आनंदाच्या भरात ते स्टेजवर नाचत होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते झोपले. सुरुवातीला लोकांना काय झाले ते समजले नाही. पण मृत्यूची माहिती मिळताच विवाह सोहळ्यात शोककळा पसरली.
लग्नात नाचताना अशा प्रकार हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढत आहे. याआधी अनेक तरुणांना देखील नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत (Heart Attack Symptoms) देत असता. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.