सैनिक जेव्हा सीमेवर जातो, तेव्हा त्याच्या आईची अवस्था दाखवणारा हा बोलका फोटो
या फोटोमध्ये एक बंद गेट दिसत आहे, ज्याच्या एका बाजूला आई रडत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. म्हणूनच तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच फोनमध्ये आपल्याला सोशल मीडिया पाहायला मिळतो. येथे सगळ्याच प्रकारचा कन्टेन्ट आपल्याला मिळतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जो फारच वेगळा आहे. हा एक फोटोच आपल्याला बरंच काही सांगून जात आहे. ज्यामुळे आपल्याही अंगावर काटा येईल.
या फोटोमध्ये एक बंद गेट दिसत आहे, ज्याच्या एका बाजूला एक आई रडत आहे, तर त्या गेटच्या दुसऱ्या बाजूला त्या आईचा मुलगा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या आईपासून लांब जात आहे.
हा फोटो सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी शेअर केला आहे आणि देशभरातील लोकांकडून या फोटोला खूप प्रेम मिळत आहे. लोक या फोटोला लाईक्स आणि शेअर करत आहेत.
खरंतर या रडणाऱ्या आईचा मुलगा एक जवान आहे, जो त्याच्या देशाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जात आहे. या आईला माहितीय की आपला मुलगा आता लवकर परत येणार नाही, किंवा आपली भेट आता पुन्हा कधी होईल, हे त्या आईला आणि मुलाला माहित नसते. त्यामुळे आपल्या मुलाच्या विरहाने ती स्वत:च्या भावना रोखू शकत नाहीय, ज्यामुळे तिला रडू आलं आहे.
हा फोटो खूप काही सांगून जातो. एका आईला किंवा एका मुलाला एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो. हे शब्दात मांडणं कठीण आहे.
परंतु तरीही आपल्या भावना निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी हा फोटो शेअर करताना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी हा फोटो ट्वीटरवर पोस्ट करत लिहिले की, 'मी जवळपास तीन दशकांपूर्वी माझी आई गमावली. प्रत्येक सैनिकाच्या आईमध्ये मला तो दिसतो. मी त्याला भारत मातेत पाहतो. आई तुला सलाम. "