हैदराबाद : आंध्रप्रदेशातील हैदराबाद शहरात सोमवारी तुफान पाऊस पडला. त्यामुळे शहरभर पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच तिघा जणांच्या मृत्यूचे वृत्त आले आहे. दरम्यान, सरकारने शाळा-महाविद्यालये काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील परिस्थितीसाठी हवामान विभागाने मान्सूनला जबाबदार ठरवले आहे. शासन आणि प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी एमडीआरएफचे पथकही तैनात करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घर आणि दुकानांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाणी साचले असून, शहरात वाहतुक कोंडी झाली आहे. शहरातील पूरस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने उद्या (मंगळवा, ४ ऑक्टोबर) शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.


हवामान विभागाने म्हटले आहे की, ४.३० पासून ८.३० वाजेपर्यंत ६७.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.