IAS Aspirant Death: मुंबई, पुण्यासह देशभरात पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. दरम्यान येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यूपीएससीची कोचिंग सेंटरमध्ये पाणी घुसले. हे पाणी इतक्या प्रमाणात होते की यामध्ये  विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू झाला. हे दोन्ही विद्यार्थी आयएएसची तयारी करणारे होते. यासोबतच एक विद्यार्थी बेपत्ता असल्याचेही माहिती समोर येत आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. मध्य दिल्लीच्या राजेंद्र नगरमध्येही घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफची टीम बचावासाठी पोहोचली. आयएएस स्टडी सेंटरमध्ये ही घटना घडली असून जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 


2 विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्याकाळी 7 वाजता राजेंद्र नगरच्या एका यूपीएससीच कोचिंग संस्थेच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आम्हाला मिळाले. येथे काही लोकं अडकण्याची भीती वर्तवण्यात आली होती. संध्याकाळी आलेल्या खूप मोठ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होत, अशी माहिती डीएसपी हर्षवर्धन यांनी दिली. पूर्ण बेसमेंट कसं भरल? या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. बेसमेंटमध्ये खूप वेगाने पाणी भरत गेलं. यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर येत आलं नाही. यात त्यांचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.दिल्ली अग्नीशमन दल आणि एनडीआरएफची बचाव टीम येथे शोधमोहिम आणि बचाव कार्य राबवत आहे.ही घटना कशी घडली? याच्या चौकशीचे आदेश मॅजिस्ट्रेटने दिलेयत. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 


आयएएसची तयारी करणाऱ्या तरुणांना करंट


पटेल नगर मेट्रो स्थानकाजवळ पॉवर जिमच्या गेटच्या बाजूला आयएएस सेंटर आहे. येथे यूपीएससी तयारी करणाऱ्या तरुणांचा मृत्यू झाला. निलेश असे यातील एका तरुणाचे नाव आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने जिमच्या गेटमध्ये करंट आला. यानंतर तरुण करंटच्या विळख्यात आले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.