केरळ: मुसळधार पावसाने केरळमध्ये हाहाकार माजला आहे. अनेक घरांमध्ये कंबरेएवढं पाणी आहे. तर रस्त्यांना अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. अनेक गावांमध्ये महापुरानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोट्टयम जिल्हातील कोट्टक्कल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि महापुराने कहर केला. त्या पाठोपाठ आणखी एक संकट ओढवलं. तिथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार भूस्खलनात अनेक लोक या भूस्खलनात गेल्याची शक्यता आहे. भूस्खलानाची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी आतापर्यंत 15 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अद्याप बरेच लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


केरळमधील अतिमुसळधार पावसानंतर पठानमथिट्टामध्ये मनियार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ज्यामुळं नजीकच्या भागामध्ये पाणी शिरलं. केरळमधील डोंगराळ भागात सैन्य आणि वायुदलाची पथकं मदतीसाठी पोहोचलं आहे. केरळ पट्ट्यामध्ये मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. शनिवारप्रमाणेच रविवारीही इथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं केरळमधील नागरिकांमध्ये पावसाची दहशत पाहायला मिळत आहे.