Inspirational Story : जर तुमच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतेही लक्ष सहज गाठू शकतात. याच जोरावर एक अंगणवाडी सेविका गावातली पोलीस उपनिरीक्षक (sub inspector of police) बनली आहे. या पहिल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव हेमलता जाखड (hemalata jakhar) आहे. महिलेने हे यश संपादन करताच तिच्या भावांनी तिला खांद्यावर उचलून संपुर्ण गाव फिरवले आहे. आता या तरूणीची चर्चा संपुर्ण राज्यभर सुरु आहे, तसेच तिची प्रेरणादायी कहाणी वाचून अनेक तरूण-तरूणी प्रेरीत होतायत.


हे ही वाचा : बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ


अथक परिश्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमलता जाखड (hemalata jakhar) ही तरूणी गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची. तिचे पोलीस उपनिरीक्षक (sub inspector of police) बनण्याचे लक्ष होते. यासाठी ती दिवस रात्र अतोनात मेहनत करायची. अंगणवाडी सेविकेचे काम करत त्यामधून वेळ काढत ती पोलीस सेवेत दाखल होण्यासाठी मेहनत करायची. आता तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्यामुळे तिचे कुटूंब आनंदी आहे.  


गावात जल्लोषात स्वागत


हेमलता (hemalata jakhar) ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक (sub inspector of police) बनून गावात आली त्यावेळी तिच्या घरच्यांनी व गावातल्या मंडळींनी तिचे जल्लोषात स्वागत केले. गावात पाय ठेवताच गावातल्या मंडळीनी तिला खांद्यावर उचलून गावभर मिरवणूक काढली. तसेच घरच्यांनी देखील घरी आल्यावर तिचे गाणे गाऊन स्वागत केले. या स्वागताने ती खुपच भारावून गेली. 


छोट्याशा गावातून पाहिलं मोठं स्वप्न


पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या बारमेरच्या सारनू या छोट्या गावात हेमलता जाखड (hemalata jakhar) राहते. या छोट्याशा गावातून तिने मोठं स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवून दाखवलं. हेमलता जाखड गावातली पहिलीवहिली महिला अधिकारी बनली आहे. तिच्या या यशाचे गावकऱ्यांसह कुटूंबियांना खुप कौतूक आहे. 


यशाबद्दल काय म्हणाली ? 


हेमलता (hemalata jakhar) तिच्या यशाबद्दल सांगताना म्हणाली की, 2021 मध्ये राजस्थान पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. माझी निवड होईपर्यंत सरणूसह माझ्या गाव परिसरातील मी पहिलीच पोलीस अधिकारी झाले होते.एकही पुरुष किंवा एकही महिला आमच्या या परिसरातून अधिकारी झाली नव्हती असे ती सांगते. तसेच लोकांचे टोमणे सहन करत मी या पदापर्यंत पोहोचल्याचे ती सांगते. 


दरम्यान हेमलताची (hemalata jakhar) हे यश अनेक तरूण-तरूणींसाठी प्रेरणादायी आहे.