मुंबई : Home Loan on Rs 25000 Monthly Salary:स्वत: घर घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. नोकरी मिळाल्यावर बहुतेक लोक स्वप्नातील घर घेण्याचा विचार करतात. गृहकर्ज सर्व प्रकारचे उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्या लोकांचे उत्पन्न 20 हजार ते एक लाख किंवा त्याहून अधिक आहे ते गृहकर्जासाठी पात्र ठरतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25000 रुपयांच्या पगारावर किती गृहकर्ज मिळू शकते याबाबत जाणून घेऊया. तुमच्या पगाराच्या 25 टक्के भागाहून जास्त गृहकर्जाचा हफ्ता असू नये हा सर्वसाधारण नियम आहे. तसेच पगारातील
पगारातील उरलेला भाग आपत्कालीन व इतर खर्चासाठी वाचवावा. जर तुमचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपये असेल तर त्यातील केवळ 25 टक्के म्हणजेच 12 हजार रुपये गृहकर्जाचा हफ्ता देता येईल.


गृहकर्ज इन हॅंड सॅलरीवर अवलंबून
बजाज फिनसर्व्हच्या मते, गृहकर्जाची रक्कम तुमच्या हाती येणाऱ्या पगारावर अवलंबून असते. तुम्हाला किती कर्ज द्यायचे आहे हे तुमच्या उत्पन्नावरून ठरवले जाते. कर्ज देणारी कंपनी तुमचा टेक होम सॅलरी हा आधार मानते आणि त्यातून ग्रॅच्युइटी, पीएफ, ईएसआय कापले जातात.


25000 रुपयांना किती मिळणार गृहकर्ज 
जर तुमचा टेक होम पगार 25000 रुपये असेल तर कोणतीही बँक तुम्हाला 25 वर्षासाठी 18.64 लाख रुपये कर्ज देऊ शकते. आणि तुमचा टेक होम पगार 50,000 रुपये असेल तर तुम्हाला 37.28 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. घर घेण्यासाठी पगार जास्त असेल, त्याचप्रमाणे गृहकर्जाची रक्कमही जास्त असेल.


या गोष्टी लक्षात ठेवाव्या
गृहकर्ज घेताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. यामध्ये क्रेडिट स्कोअरपासून अनेक गोष्टींचा समावेश होतो. गृहकर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर सुधारून घ्यावा. याशिवाय अर्जदाराच्या वयाचाही गृहकर्जावर परिणाम होतो, वयानुसार, तुम्ही किती कालावधीत गृहकर्जाची पूर्तता कराल हे मोजले जाते.


संयुक्त गृह कर्जाचा पर्यायही उपलब्ध
तुमची गृहकर्ज पात्रता वाढवण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमचा CIBIL स्कोर सुधारणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या नावावर आधीच कर्ज चालू असेल तर ते लवकरात लवकर निकाली काढा जेणेकरून तुम्ही गृहकर्ज घेऊ शकता. तुम्ही संयुक्त गृह कर्ज देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात जास्त त्रास होणार नाही.