पाटीदार आरक्षण; हार्दिकच्या अल्टीमेटमला कॉंग्रेसचे उत्तर
पाटीदार आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टीमेटमला कॉंग्रेसने उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : पाटीदार आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टीमेटमला कॉंग्रेसने उत्तर दिले आहे.
गुजरातमधील वराछा येथील जलक्रांती मैदानात ३ नोव्हेंबरला कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेपूर्वीच कॉंग्रेसने पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाटीदार आरक्षणाबाबत कॉंग्रेस कायदेशीर बाबी तपासून पाहिल त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करेन, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी सोमवारी एक बैठक घेतली. त्यात विचारविनीमय केल्यावर गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदा आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, कॉंग्रेसल अल्टीमेटम देताना पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले होते. त्यात पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत कॉंग्रेसची भूमिका काय आहे, आहा प्रमुख प्रश्न होता.
दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभा नवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी गुजरातची निवडणूक महत्त्वाची आहे. केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे गुजरातमध्ये भाजपच सत्तेत आहे. तर, १०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. कारण, भाजपला सत्ता टिकवण्याचे तर, कॉंग्रेसला पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान या निवडणुकीत असणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी रणनीती आखली आहे.
दरम्यान, भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने अल्पसंख्याक तसेच बहुजन मतांची गोळाबेरीज करून निवडणूक लढण्याची रणनिती ठरवली आहे. तर, भाजप हिंदूत्व, केंद्र सरकारने केलेला विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागणार असल्याची माहिती आहे.