Latest News : देशातील सर्वोच्च न्यायालय असो किंवा मग उच्च न्यायालयं आणि खंडपीठं असो. अनेकदा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर महत्त्वाचे निकाल आणि निरीक्षणं सुनावण्याचं काम या न्यायसंस्थेकडून आतापर्यंत वेळोवेळी करण्यात आलं आहे. त्यातच आता आणखी एका निकालाची भर पडली असून, अनोळखी व्यक्तीला तुम्ही नेमकं काय संबोधता यामुळंही तुमच्या अडचणीत भर पडू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोर्टब्लेअर खंडपीठाच्या न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी नुकतंच एका प्रकरणावरील निकालाच्या निरीक्षणाअंतर्गत नोंदवलेल्या भूमिकेनुसार जर एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले तर तो लैंगिक छळाचा गुन्हा मानला जाईल. जी व्यक्ती यामध्ये दोषी आढळेल त्या व्यक्तीला भारतीय दंडसंविधानाच्या कलम 354 अ अन्वये तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 


न्यायालयाच्या निकालानुसार... 


एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणं किंवा तशी हाक मारणं दुन्हा आहे. सध्यातरी आपल्या समाजात रस्त्यावरील कोणीही पुरुष अज्ञात महिलेला उद्देशून कशाचीही तमा न बाळगता बोलण्यासाठीची परवानगी देणारा कोणताही कायदा नाही. परिणामी भारतीय दंडसंविधानातील कलमाचा संदर्भ देत पोलीस किंवा अन्य कोणत्याही अज्ञात महिलेला 'डार्लिंग' म्हटलं जाऊ शकत नाही, हे लैंगिक छळाचं कृत्य आहे असं न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार? 


 


नेमकं काय घडलं होतं? 


न्यायालयानं ज्या प्रकरणी हा निकाल सुनावला त्यामध्ये घडलेल्या घटनेच्या दिवशी पीडित महिला पोलीस कॉन्स्टेबल दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला आपलं कर्तव्य बजावण्यासाठी लाल टीकरी येथे जात होती. पोलीस पथक ज्यावेळी वेबी जंक्शन येथे पोहोचलं तेव्हा एका व्यक्तीकडून स्थानिकांना त्रास दिला जात असल्याचं कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी पीडिता आणि इतर पोलीस एका दुकानापाशी थांबले होते. 


तिथं उभ्या असणाऱ्या आरोपीनं फिर्यादीला, 'डार्लिंग चालाना करायला आलेली का?' असा प्रश्न विचारला. ज्यानंतर मायाबंदर पोलीस ठाण्यात IPC च्या 354 अ 4 आणि 509 अंतर्गत महिलेचा विनयभंग, त्या उद्देशानं हावभाव, शब्दप्रयोग आणि कृत्य केल्यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आली होती.