नवी दिल्ली : फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई पाठोपाठ दिल्लीत रुग्णांची रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील चढत्या क्रमावर आहे. दिल्लीत ७७ टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी २ हजार ८९ नवे कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ज्यानंतर दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिल्लीत देखील चिंतेचे वातावरण आहे. दिल्लीत आतापर्यंत ८४ हजार ६९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. 


दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये दिल्ली ४२ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, २३ जून रोजी राजधानी दिल्लीत सर्वाधिक ३ हजार ९४७  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


गुरूवारी दिल्लीत कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्यांची संख्या ३ हजार २५८ एवढी होती तर आतापर्यंत ती संख्या ३ हजार ३०० वर पोहोचली आहे. अशा सर्व महामारीच्या परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे दिल्लीत कोरोनावर मात करणाऱ्यांची ७७.६० टक्क्यांवर पोहोचली आहे.