नवी दिल्ली: केंद्र सरकारने १ जूनपासून देशभरातील लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला असतानाचा आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८,३८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. त्यामुळे देशातील Unlock 1 कितपत यशस्वी ठरणार, याबद्दल शंका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन ५ : प्रवास आणि वस्तूंच्या ने-आण करता 'हे' नियम

गेल्या २४ तासांतील नवे रुग्ण पकडून देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता १,८२, १४३ इतका झाला आहे. आतापर्यंत ५,१६४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी ८९९९५ जणांवर उपचार (Active cases) सुरु आहेत. तर ८६,९८४ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 



खोकला आणि शिंका आल्यामुळे अटक झालेल्या भाजप नेत्याला पोलिसांनी सोडले

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. काल हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६५,१६८ झाली आहे. शनिवारी राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित आढळले असून ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रूग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता. तो आता १७.५ पर्यंत पोहोचला आहे. देशाचा रूग्ण दुपटीचा वेग हा १७.१ असा आहे. त्याचप्रमाणे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७% एवढं आहे. राज्यात मृत्यू दर ३.३७% इतका आहे.