भविष्यात हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान झालेली पाहायला आवडेल - असदुद्दीन ओवेसी
सबका साथ, सबका विकास हा फक्त जुमला, असेही ओवेसी म्हणाले
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हिजाब बंदीसंदर्भात (hijab row) वाद सुरु आहे. कर्नाटकातून (karnataka) सुरु झालेला हा वाद देशातील इतर राज्यांमध्येही पोहोचला आहे. राजकीय पक्षांनीही यावरुन राजकारण सुरु केलय. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (supreme court) असून त्यावरुन देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. एआयएमआयएमचे (aimim) खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) हे गेल्या काही दिवसांपासून भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवरुन सातत्याने भाष्य करत आहेत. ओवेसी यांनी हिजाब बंदीच्या (hijab row) निर्णयानंतरही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या मुलींनी हिजाब काढून आम्ही दाढी कापावी असे तुम्हाला का वाटते? असा सवालही त्यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (hijab wearing girl become the Prime Minister of India in the future says Asaduddin Owaisi)
भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak) हे ब्रिटनचे (britain) पंतप्रधान झाल्यानंतर भारतासह जगभरात त्यांची चर्चा सुरु आहे. ऋषी सुनक यांच्यावरून भारतातील राजकारण अधिकच तापले आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी ऋषी सुनक यांच्या निमित्ताने सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओवेसी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) हल्लाबोल करत सबका साथ, सबका विकास हा फक्त जुमला असल्याचे म्हटले आहे. जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. ऋषी सुनक (rishi sunak) हे पंतप्रधानपदावर पोहोचल्यानंतर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला भविष्यात हिजाब (hijab) घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान झालेली पाहायला आवडेल, असे ओवेसी यांनी म्हटलं आहे.
"मुस्लिमांना देशातून हटवणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. हलाल मांस देशासाठी धोका आहे, मुस्लिमाची दाढी धोका आहे, मुस्लिमाची टोपी धोका आहे, मुस्लिमांचे खाणे, पेय, कपडे, सोने हे सर्व धोका आहे. भाजप मुस्लिम अस्मितेच्या विरोधात आहे. एका खासदाराने मुस्लिमांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं. हा भाजपचा अजेंडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सबका साथ और सबका विकास' म्हणतात पण ते केवळ तोंडी आहे. भाजपचा खरा अजेंडा देशाची विविधता आणि मुस्लिम अस्मिता नष्ट करण्याचा आहे," असेही ओवेसी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनीही ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या (UK) पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. 'आधी कमला हॅरिस आणि आता ऋषी सुनक... अमेरिका आणि ब्रिटनने अल्पसंख्याकांना देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मला वाटते की हा भारत आणि इथल्या राजकीय पक्षांसाठी धडा आहे,' असे चिदंबरम यांनी म्हटलं आहे.