नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीत शुक्रवारी विक्रमी वाढ पाहण्यात आली. महाशिवरात्रीच्यादिवशी शुक्रवारी दिल्ली सराफा बाजार बंद होता. पण जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली. शुक्रवारी MCX वर सोन्याचा दर ४२, ७९० हुन अधिकवर पोहचला होता. गेल्या ३ महिन्यांत सोन्याचा दर (Gold Price) प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ४,५०० रुपयांनी वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचा भाव ४३ हजारांपर्यंत पोहचला आहे. येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ५० हजारापर्यंत जाण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोनं दर वाढीचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ होते आहे. नोटबंदी पासूनच सोन्याच्या भावात प्रचंड बदल झाले असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.


सोन्याच्या दरात वाढ होण्याच्या ५ महत्त्वाच्या कारणांबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे.


- कोरोना व्हायरसमुळे ग्लोबल ग्रोथची चिंता वाढली आहे.
- ग्लोबल ग्रोथच्या चिंतेमुळे, सुरक्षित गुंतवणूकीच्या मागणीत वाढ
- सेंट्रल बँकांची खरेदारी पुढे जाण्याचा अंदाज
- जागतिक राजकीय संकटाचा परिणाम
- रुपयांच्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात मागणीवर परिणाम


चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. शुक्रवारी MCXवर चांदीचा दर ४८,५०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.


अमेरिका-ईरान यांच्यातील वाढत चाललेला संघर्ष यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. गुरुवारी सोन्याचा भाव ४१ हजारांच्या घरात होता. मे-जूनपर्यंत सोनं आणखी ५ ते ६ हजारांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.