मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.७७ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७६.९८ रुपये नागरिकांना मोजावे लागतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाल्यामुळे भारतात कच्चा तेलाच्या दरात सतत वाढ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या  दरात पुन्हा एकदा रेकॉर्ड स्तर पाहायला मिळत आहे. चार शहरात पेट्रोलची किंमत 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी त्रास देणार असल्याचे सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष सतत पेट्रोल - डिझेलच्या दरात जीएसटी आणण्याची मागणी करत आहे. तर सरकार एक्साइज  ड्युटीमध्ये कमी करण्यास मनाई करत आहे.


'भारत बंद'ची हाक


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलंच हत्यार सापडलं आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात 10 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे.