Himachal Pradesh Election: काँग्रेस-भाजप उमेदवारांमध्ये तुंबळ हाणामारी, पाहा Video
Sukhram Choudhari clash with Congress candidate: विरोधक उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानं मोठा राडा झाला. या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने मंत्र्यांना संताप अनावर!
Himachal Pradesh Election 2022: देशाच्या राजकारणात नेहमी काँग्रेस (Congress) आणि भाजपचे (BJP) उमेदवार निवडणुकीच्या मैदानात भिडताना दिसतात. अशातच आता हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पावटा साहिब (Paonta Sahib) मतदारसंघातील गोरखुवाला पंचायतीच्या श्यामपूर मतदान केंद्रावर भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांशी भिडल्याचं (bjp and congress candidates clash) पहायला मिळालं आहे.
काँग्रेस आणि भाजप यांच्यात (Himachal Pradesh Election 2022) जोरदार बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरील वातावरण तणावपूर्ण बनलं. भाजपचे उमेदवार आणि ऊर्जामंत्री सुखराम चौधरी (Sukhram Choudhari) यांनी वारंवार मतदान केंद्राला भेट दिल्यानं इतर राजकीय पक्षांच्या समर्थकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर वाद समोर आला.
विरोधक उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानं मोठा राडा झाला. या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याची माहिती मिळत असल्याने भाजपचे उमेदवार सुखराम चौधरी (Sukhram Choudhari Fight) पाहणी करत होते. यामुळे ते मतदान केंद्रावर पोहोचले होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मात्र, त्यानंतर देखील मतभेद दिसून आल्यानं मोठा गोंधळ उडाला.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत प्रकरण मिटवलं. डीएसपी रमाकांत (DSP RamaKant) यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी वातावरण शांत झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असं ते म्हणाले.