हिमाचल प्रदेश एक्झिट पोल: ‘आजतक’ने काय वर्तवला इथे अंदाज?
इतर एक्झिट पोल प्रमाणेच आजतकच्या एक्झिट पोलमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फायदा होणार असल्याचे दाखवले आहे.
मुंबई : इतर एक्झिट पोल प्रमाणेच आजतकच्या एक्झिट पोलमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फायदा होणार असल्याचे दाखवले आहे.
काय आहे समीकरण?
हिमाचलमद्ये एकूण ६८ विधानसभा जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ६८ पैकी कॉंग्रेस ३६ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २६ मिळाल्या होत्या आणि इतरांना ६ जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला २००७ च्य तुलनेत २०१२ मध्ये १३ जागांचा फायदा झाला होता. तर भाजपला २००७ च्या तुलनेत २०१२ मध्ये १६ जागांचं नुकसान सहन करावं लागलं होतं. आजतकच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचलमध्ये भाजपला ४७ ते ५५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर कॉंग्रेसला १३ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना केवळ २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कुणाला किती मतदान मिळणार?
हिमाचलमध्ये कॉंग्रेसला ४१ टक्के, भाजपला ५० टक्के, तर इतरांना ९ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे.
कुणाला किती जागा?
आजतकच्या एक्झिट पोलनुसार, इथे भाजपला ४७ ते ५५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला १५ ते २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या अंदाजानुसार हिमाचलमध्ये भाजपचं सरकार बनण्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत हिमाचलमध्ये कॉंग्रेस आणि भाजपचं आलटून पालटून सत्ता होती. सध्या इथे कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला विश्वास आहे की, त्यांना विजय मिळेल.