नवी दिल्ली : हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल भाजपच्या बाजुने दिसत असला तरी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमाल यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आघाडीवर यांनी आघाडी घेतली.


भाजपने जोरदार मुसंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेसाठी लागणारे बहुमत पदरात पाडल्याचे आलेल्या कलवरुन दिसत आहे. सुजानपुर मतदार संघातून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल हे काँग्रेस उमेदवार राजेंद्र राणा यांच्याकडून पराभूत झालेत.


भाजपकडे बहुमताचा आकडा 


भाजपचे उमेदवार ४३ जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस पक्ष २३ जागांवर आघाडीवरआहे. याशिवाय, २ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे. हिमाचल विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण ६८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. भाजपकडे बहुमताचा आकडा दिसत आहे.


पुन्हा एकदा काँग्रेस- भाजपला आलटून पालटून सत्ता


या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस- भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा पॅटर्न कायम राखला. याशिवाय, या विजयामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. यामुळे आता भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९ वर गेली आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेलेय.